शाहरुख खान बॉलिवूडचा बाहशहा म्हणून ओळखला जातो. या बादशहाचे जगभरात कोट्यवधी चाहते आहे. शाहरुखची एक झलक पहायला मिळावी ही त्याच्या कित्येक चाहत्यांची इच्छा असते. शाहरूखनं आपल्या आजारी भावाला एकदा तरी भेटावं यासाठी एक चाहता सलग १५० दिवसांपासून शाहरुखला विनंतीचे मेसेज करत आहे. या दीडशे दिवसांत शाहरुखकडून एकदाही उत्तर आलं नाही मात्र त्यानं प्रयत्न सोडले नाही अखेर त्यांची विनंती शाहरुखपर्यंत पोहोचली असून त्याला लवकरच भेटू असं आश्वासनही शाहरूखनं दिलं आहे.
अमरितचा भाऊ राजू हा सेरेब्रल पाल्सी आजारानं पीडित आहे. शाहरूखला एकदा भेटावं ही राजूची त्याची इच्छा आहे. आपल्या मोठ्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमरित गेल्या वर्षभरापासून शाहरूखला मेसेज करत आहे. मात्र काही कारणांमुळे हे मेसेज शाहरूखपर्यंत पोहोचले नाही. पण अमरितनं हार मानली नाही त्यानं एक व्हिडिओ शाहरूखला पाठवला. हा व्हिडिओ शाहरूखपर्यंत पोहोचला. शाहरूखनं आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत अमरितची माफी मागितली आहे.
Sorry Amrit I hadn’t seen your video. Please give my regards to mummyji & I will figure out & speak to RAJU soon. https://t.co/hBQvmLqHgQ
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 26, 2019
काही कारणांमुळे त्याचे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचले नाही त्याबद्दल शाहरूखनं चाहत्याची क्षमा मागितली आहे. तसेच आजारी राजूला लवकरच भेटायला येईन असं आश्वासनही शाहरूखनं दिलं आहे.
जुलै २०१८ पासून अमरित ट्विट करत आहे. अखेर फेब्रुवारी २०१९ मध्ये शाहरुखपर्यंत पोहोचण्यास त्याला यश आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 11:35 am