News Flash

किंग खानला हॉलिवूड कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर

शाहरुखचा 'सेल्फी मुमेंट'..

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुखचे जगभरात चाहते आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्याची, त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची लाखो तरुण- तरुणींची इच्छा असते. अशा या शाहरुखला एका कार्यक्रमात हॉलिवूड कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शाहरुखने हॉलिवूड कलाकारांकडे त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली.

या कार्यक्रमात ‘क्रिस्टल अवॉर्ड’ प्रदान करत किंग खानचा गौरव करण्यात आला. यावेळी हॉलिवूड कलाकार केट ब्लँचेट आणि प्रसिद्ध गायक एल्टन जॉन हे दोघेही उपस्थित होते. पुरस्कार स्विकारल्यानंतर शाहरुखने या दोघांना त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. या दोघांची त्याने तोंडभरून प्रशंसाही केली. ‘केंट आणि एल्टनच्या सहवासात राहणं ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. केंट या अशा अभिनेत्री आहेत, ज्या वाऱ्याचीही दिशा निश्चित करू शकतात. एल्टन यांनी त्यांच्या मधुर आवाजाने माझ्यासह अनेकांनाच मंत्रमुग्ध केले आहे,’ असे शाहरुख म्हणाला.

वाचा : ‘पद्मावत’ पाहण्याचा पत्नीचा हट्ट तर पतीला हवी सुरक्षेची हमी

शाहरुखच्या ‘मीर फाऊंडेशन’ने केलेल्या कामाची विशेष दखल घेऊन त्याला क्रिस्टल अवॉर्डने गौरवण्यात आले. ही संस्था भारतातील अनेक लहान मुले आणि महिलांच्या अधिकारांसाठी काम करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 7:19 pm

Web Title: shah rukh khan fan moment in world economic forum summit
Next Stories
1 VIDEO : माधुरीसोबत सुमीतने अनुभवली ‘पैसा वसूल राइड’
2 सोनाली कुलकर्णीच्या ‘गुलाबजाम’ सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित
3 ‘पद्मावत’ पाहण्याचा पत्नीचा हट्ट तर पतीला हवी सुरक्षेची हमी
Just Now!
X