News Flash

भारतच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी शाहरुखला आमंत्रण?

या स्क्रिनिंगसाठी कोणते बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफचा बहूचर्चीत चित्रपट ‘भारत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बस जफर यांनी केले असून ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. काही ठिकाणी या चित्रपटाचे सलमानकडून स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले आहे. तसेच या स्क्रिनिंगसाठी कोणते बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘बॉलिवूडलाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने भारत चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी त्याच्या खास आणि जवळच्या मित्रमैत्रीणींना आमंत्रण दिले आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांमध्ये सलमान आणि शाहरुखला एकत्र पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.

याआधी संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात ‘करण-अर्जुन’ उर्फ सलमान खान आणि शाहरूख खानची जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात होते. तसेच १९५२मध्ये प्रदर्शित झालेल्या मीना कुमारी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाचा हा रिमेक असल्याचे म्हटले जात होते. तसेच सलमानच्या ‘दबंग ३’ या चित्रपटात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या देखील चर्चा आहेत.

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” या दक्षिण कोरियन चित्रपटावर आधारलेला आहे. यामध्ये सलमानसोबत जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, सुनील ग्रोवर, दिशा पटानी, नोरा फतेही यांच्याही भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 5:09 pm

Web Title: shah rukh khan gets invited by salman khan for bharat special screening
Next Stories
1 दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये ‘थलायवा’ रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय
2 प्रियकराच्या मृत्यूनंतर खचून मलेशियाला गेलेली अंकिता मिलिंदला भेटली अन..
3 गणेश गायतोंडेनंतर नवाजुद्दीन सिद्दीकी होणार ‘Serious Man’
Just Now!
X