‘रईस’ सिनेमातून सर्वांच्या भेटीला आलेले सुपरस्टार शाहरुख आणि नवाजुद्दीन यांनी अनेकांची मनं जिंकली होती. हा सिनेमा पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच वाढ झाली असेल यात काही शंका नाही. आपली ही नव्याने घडवलेली इमेज सांभाळण्याच्या प्रयत्नात हे दोघं असताना एक विघ्न यात आलं आहे. अभिनेता शाहरुख खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना एका कंपनीची जाहिरात करणे महागात पडणार असल्याची चिन्हे आहेत. सीबीआयकडून गाझियाबादस्थित वेबवर्क ट्रेड लिंक्सने केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या ऑनलाइन घोटाळ्याची चौकशी सुरू आहे.

Afghan First Look: गाण्यानंतर आता अभिनयासाठी अदनान सामी सज्ज

या घोटाळ्यामध्ये शाहरुख आणि नवाजच्या नावाचीही चर्चा आहे. त्याचे झाले असे की या दोघांनीही या कंपनीची पोर्टल असलेल्या अॅड्सबूक डॉट कॉमचा प्रचार केला होता. वेबवर्क ट्रेड लिंक्सचा प्रमोटर अनुराग जैन आणि संदेश वर्मा यांनी अॅड्सबूक डॉट कॉम ही बनावट कंपनी बनवली होती. या कंपनीसाठी त्यांनी चक्क शाहरुख आणि नवाजची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणूनही नियुक्ती केली होती. त्यानंतर या दोघांच्या नावाचा वापर करत जैन आणि वर्मा यांनी १० डिसेंबर २०१६ पासून लोकांची फसवणूक करायला सुरूवात केली. आता एवढ्या मोठ्या व्यक्ती या कंपनीशी निगडीत आहेत म्हटल्यावर लोकांनीही डोळे बंद करून या कंपनीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे. उत्तर पोलिसांनी अजून या दोघांना आरोपी किंवा संशयित ठरवलेले नाही.

अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित- तब्बू

जैन आणि वर्मा यांनी आपल्या वेबसाइटवरील जाहिरातीवर प्रत्येक क्लिकमागे पैसे देण्याचे आमिष लोकांना दाखवले होते. क्लिक करून पैसे कमवण्याच्या आमिषाला बळी पडून थोड्याच वेळात अनेक लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले. सुमारे दोन लाख लोकांकडून जैन आणि वर्मा यांनी ५०० कोटी रुपयांएवढे पैसे गोळा केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास आता आपल्या हाती घेतला आहे.