News Flash

शाहरुखच्या गाडीभोवती लोक गोळा झाले की सुहाना रडायची!

या कारणामुळे लहान असताना सुहाना शाहरुखसोबत चित्रपटाच्या सेटवर जात नव्हती.

(Photo Credit : File Photo)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी तिचे लाखो चाहते आहेत. सुहाना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. शाहरुखच्या गाडीभोवती चाहते गोळा झाले की सुहाना रडू लागायची असा खुलासा शाहरुखने एका मुलाखतीत केला आहे.

२०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला आहे. अबरामच्या तुलनेत सुहाना आणि आर्यन लहान असताना लाजाळू होते. आर्यनला गाडीचा त्रास व्हायचा म्हणून तो कधीतरी चित्रपटाच्या सेटवर यायचा. दुसरीकडे, जेव्हा त्याच्या गाडीभोवती लोक गोळा व्हायचे तेव्हा सुहानाला भीती वाटायची आणि ती रडायची. तर अबराम हा अनेक वेळा शाहरुखसोबत चित्रपटाच्या सेटवर दिसतो. अबरामला लोकांशी बोलायला आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

आणखी वाचा : “माझा पती काही कामाचा नाही आणि…”, अनिता हसनंदानीने शेअर केले पतीसोबतचे चॅट

सुहाना आणि आर्यन दोघे मोठे झाले आहेत. आर्यनला अभिनेता होण्याची इच्छा नाही. त्याला कॅमेऱ्याच्या पाठी राहून दिग्दर्शक बनायच आहे. दुसरीकडे सुहानाला अभिनेत्री होण्याची इच्छा आहे. सुहानाने या आधी नाटकांमध्ये काम केलं आहे. सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 3:08 pm

Web Title: shah rukh khan once revealed suhana would cry when people surrounded his car dcp 98
Next Stories
1 “डॉक्टरांना त्रास देऊ नका, तुम्ही त्यांना मारू शकत नाही”, वरुण धवनने व्यक्त केला संताप
2 ‘द फॅमिली मॅन २’च्या यशानंतर भावूक झाला मनोज वाजपेयी; पोस्ट शेअर करून चाहत्यांचे मानले आभार
3 Sunil Dutt Birth Anniversary: निधनाच्या काही तासांपूर्वी सुनील दत्त यांनी परेश रावलना लिहिलं होतं पत्र…
Just Now!
X