News Flash

हा सुपरस्टार साकारणार अंतराळवीर राकेश शर्माची भूमिका

आमिरनं नकार दिल्यानंतर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार कोण याचं कुतूहल अनेक दिवसांपासून होतं.

हा चित्रपट २०१९ पर्यंत प्रदर्शित होईल असंही म्हटलं जात आहे.

अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत्या यासाठी आमिरचं नावही चर्चेत होतं. मात्र आमिरनं नकार दिल्यानंतर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार कोण याचं कुतूहल अनेक दिवसांपासून होतं. मात्र आता राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी बॉलिवूडमधल्या सुपरस्टारचं नाव निश्चित झालं आहे.

आमिरनं तारखा उपलब्ध नसल्यानं या बायोपिकसाठी नकार दिला. पूर्वी यासाठी आमिर आणि प्रियांका चोप्रा यांची निवड झाली होती. पण आता मात्र भारताचा सुवर्णक्षण आणि राकेश शर्मा यांची कामगिरी रुपेरी पडद्यावर उमटवण्याची संधी शाहरूखच्या पदरात आली आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार शाहरुखनं बायोपिकसाठी होकार दिला आहे.‘सारे जहाँ से अच्छा’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.

‘आरकेएफ प्रोडक्शन’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या वर्षअखेरपर्यंत या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट २०१९ पर्यंत प्रदर्शित होईल असंही म्हटलं जात आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्यासाठी शक्यता आहे याआधी राकेश शर्मा यांच्या बायोपिकसाठी भूमीऐवजी प्रियांका चोप्राचं नाव चर्चेत होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 3:11 pm

Web Title: shah rukh khan play role in rakesh sharma biopic
Next Stories
1 ‘CID’ मालिका घेणार क्षणभर विश्रांती
2 ‘तानाजी’ चित्रपटात काजोल साकारणार महत्त्वाची भूमिका
3 Video : प्रभासचे चाहते आहात?, तर मग हा व्हिडिओ नक्की पाहा!
Just Now!
X