News Flash

शाहरूखनं ‘किंग’सारखी केली मदत, पैशांसोबतच जेवण आणि किराणाही पुरवणार

मदत न केल्यामुळे शाहरूखवर झाली होती टीका

शाहरुख खान, गौरी खान

करोना व्हायरसवर मात करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तींसोबत व्यावसायिक आणि कलाकारही सरसावले आहेत. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार मदतीचा हात देत आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचा ओघ वाढत आहे. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख खानही मदतीसाठी सरसावला आहे. शाहरूख खानने लाखमोलाची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक मदत तर साडेपाच हजार लोकांना जेवण आणि अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार असल्याची घोषणा केली आहे. शाहरूख खानने ट्विट करत याबाबतची घोषणा केली आहे.

असा दिला मदतीचा हात –

१ ) शाहरूख खान, गौरी खान, जुही चावला आणि जय मेहता यांचा आयपीएलमधील केकेआर संघ पंतप्रधान सहायता निधीमध्ये रक्कम दान करणार.
२) गौरी खान आणि शाहरूख खान यांची रेड चिलीज एंटरटेनमेंट महाराष्ट्र सीएम रिलीफ फंडाला रक्कम दान करणार.

३) कोलकाता नाइट राइडर्स आणि मीर फाउंडेशन मिळून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना (हेल्थ वर्कर्स) ५०००० पीपीई किट उपलब्ध करून देणार.

४) मीर फाउंडेशन आणि एक साथ-द अर्थ फाउंडेशन मिळून मुंबईतील ५ हजार ५०० कुटुंबाना एक महिन्यापर्यंत जेवण देणार. तसेच ज्यांना जेवण मिळत नाही अशा २००० जणांना दररोज जेवण पुरवणार.

५) मीर फाउंडेशन आणि रोटी फाउंडेशन मिळून दररोज दहा हजार लोकांना एक महिन्यासाठी तीन लाख मील किट्स उपलब्ध करून देणार.

६) वर्किंग पीपल्स चार्टर आणि मीर फाउंडेशनसोबत मिळून दिल्लीतील २५०० कामगारांना एक महिन्यापर्यंत उपयुक्त ग्रोसरी देणार.

७) यूपी, बिहार, बंगाल आणि उत्तराखंडमधील १०० एसिड अटॅक सर्वाइवर्सना मीर फाउंडेशनकडून मासिक भत्ता दिला जाणार.

अशा प्रकारे शाहरूख खान आणि त्याच्या कंपन्या मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे मदतीसाठी काम करणार आहेत. गेल्या आठवड्यात मदत न केल्यामुळे शाहरूख खान सोशल मीडियावर टीकेचा धनी ठरला होता. नेटकऱ्यांनी शाहरूख खानवर टीकेची झोड उडवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 10:15 am

Web Title: shah rukh khan pledge support to pm cares fund and maharashtra cm relief fund and also extend contribution for food and grocery nck 90
Next Stories
1 Coronavirus Lockdown : रामायण मालिकेने केला धडाकेबाज विक्रम
2 करोनाच्या कचाट्यात आणखी एक हॉलिवूड अभिनेत्री; शेअर केला अनुभव
3 Video : लॉकडाउनमुळे घरात बसलेल्या रितेशला जेनेलियाने घासायला लावली भांडी
Just Now!
X