बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान ‘फॅ न’ चित्रपटातून दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. एरव्ही चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी रिअॅलिटी शो आणि मालिकांचे उंबरठे झिजवणारा शाहरुख खान पहिल्यांदाच ‘फॅ न’च्या प्रसिद्धीसाठी मराठीच्या दारी अवतरला. शाहरुखला त्याच्या निर्मात्यांकडून मुंबईत ‘फॅ न’ची गर्दी वाढवण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’चे व्यासपीठ गाठण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे पहिल्यांदाच हिंदीचा सुपरस्टार आपल्या शोच्या मंचावर दाखल झाला, अशी माहिती डॉ. नीलेश साबळे याने ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना दिली.