News Flash

पाहा: ..अशा प्रकारे शाहरुखने केला अब्रामचा बचाव

गाढ झोपी गेलेला अब्राम काही क्षणांसाठी जागा झाला

शाहरुखने अब्रामला उचलून घेतले होते.

अभिनेता शाहरुख खानला नुकतेच मुंबईतील विमानतळावर त्याच्या धाकट्या मुलासोबत पाहण्यात आले. विमानतळामध्ये शाहरुखने अब्रामला उचलून घेतले होते. त्यावेळी अब्राम शांत झोपी गेला होता. अब्राम आणि शाहरुखला पाहताच प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांनी लगेचच त्यांचे कॅमेरे या सेलिब्रिटी बाप-बेट्यांचे फोटो काढण्यासाठी वळवले.

या सर्व गोंधळामध्ये गाढ झोपी गेलेला अब्राम काही क्षणांसाठी जागा झाला आणि लगेचच पुन्हा झोपी गेला. प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांची गर्दी पाहता शाहरुखनेही अब्रामची झोप मोड होणार नाही याची चांगलीच काळजी घेतली. त्यावेळी शाहरुख खान दिल्लीला त्याच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जात होता. हल्ली शाहरुख ज्या ज्या ठीकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्याच्यासोबत अब्रामही असतोच. काही दिवसांपूर्वी शाहरुख त्याच्या ‘द रिंग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने बुडापेस्ट आणि हंगरी अशा विविध ठिकाणी गेला होता. त्याचवेळी अब्रामही शाहरुखसोबत होता. त्यामुळे सध्यातरी अब्राम आणि शाहरुख एकमेकांपासून जास्त दूर राहात नाहीयेत. पापा शाहरुख त्याच्या चित्रपटांना जितके महत्त्व देत आहे तितकाच वोळ तो अब्रामलाही देत आहे हे तर स्पष्ट आहे.

तुर्तास, किंग खान त्याच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. शाहरुख खान, आलिया भट्ट आणि कुणाल कपूर यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरी शिंदेने केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खान आणि आलिया भट्ट प्रथमच स्क्रिन शेअर करत आहेत. २५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

dsc_9625

dsc_9626-1

dsc_9636

dsc_9639

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:33 pm

Web Title: shah rukh khan protecting his son abram from cameras will win your heart see pics
Next Stories
1 ‘नीरजा’च्या कुटुंबियांच्या वतीने सोनमने स्वीकारला हा पुरस्कार
2 शाहिदसाठी दीपिका खूपच उंच?
3 अजय देवगणची बॉलिवूडमध्ये पंचवीशी
Just Now!
X