27 February 2021

News Flash

VIDEO : मैत्रीणींसोबत ‘हा’ खेळ खेळण्यात रमली सुहाना

सुहाना नेहमीच विविध कारणांनी चर्चेत दिसते. मात्र, यावेळी ती वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

सुहाना खान

बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला स्टार्सपेक्षा स्टारकिड जास्त प्रकाशझोतात येतांना दिसून येत आहे. त्यातच सुहाना खान हे नाव कायम आघाडीवर असतं. सुहाना आपल्या वडीलांच्या म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसून येत आहे. सुहाना नेहमीच विविध कारणांनी चर्चेत दिसते. मात्र, यावेळी ती वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

सुहानाचे अनेक फोटो व्हायरल असतांना तिच्या आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती आपल्या मैत्रीणींबरोबर संगीत खुर्ची खेळतांना दिसून येत आहे. या व्हिडिओ मध्ये ती या खेळाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे.

सुहाना मध्यंतरी आयपीएल २०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला प्रोत्साहन देतांना दिसून आली होती. सध्या सुहाना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असून ती देखील आपल्या वडीलांप्रमाणे बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. सुहाना आपल्या अभिनयाची झलक शाळा-महाविद्यालयात होणा-या कार्यक्रमांमध्ये दाखवत आलेली आहे. मात्र, सुहाना सध्या शिकत असल्यामुळे तिच्या करिअरपेक्षा तिच्या शिक्षणाला अधिक महत्व देण्यात येत असल्याचे शाहरुख खानने यापूर्वी सांगितले होते.

वाचा : आलियाच्या चित्रपटाला एकही कट न देता सेन्सॉर ‘राजी’

शाहरुख खान आपल्या करिअरप्रमाणेच आपल्या कुटुंबियांकडेही तितकेच लक्ष देत असतो. कुटुंबाप्रतीचे त्याचे प्रेम अनेक वेळा त्याच्या चाहत्यांनी पाहिले असून अब्राम आणि सुहाना हे शाहरुखच्या एकदम जवळचे असल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 2:14 pm

Web Title: shah rukh khan s daughter suhana is grabbing the eyeballs
Next Stories
1 Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात रंगणार चोर- पोलीसचा खेळ
2 हसण्यासाठी जन्म आपुला…
3 भारत- पाक सीमेनजीक सलमानसाठी का सुरु आहे शोधमोहिम?
Just Now!
X