24 September 2020

News Flash

शाहरुख-सलमानची सायकल स्वारी

भाई भाई सायकलवर.. प्रदूषणाला आळा..

बॉलीवूडचे दोन खान शाहरुख आणि सलमान यांची मैत्री आता पुन्हा चांगलीच बहरत चालली आहे. त्यांचा हा दोस्ताना अंदाज शुक्रवारी वांद्र्याच्या रस्त्यावर पाहयला मिळाला. या दोन्ही सुपरस्टार्सनी सायकल स्वारीचा आनंद लुटला.
शाहरुखने सलमानसोबतचा एक फोटो ट्विट केला असून भाई भाई सायकलवर.. प्रदूषणाला आळा.. मायकल लाल आणि सायकल लाल, असे पोस्ट केले आहे. फोटोत हे दोन्ही खान सायकलवर बसलेले दिसतात. शाहरुखने पांढ-या रंगाचा शर्ट, पॅन्ट आणि वेस्टकोट परिधान केलेला दिसतो. तर सध्या सुलतान चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झालेला सलमान काळ्या रंगाचा टीशर्ट आणि जीन्स या कॅज्य़ुअल लूकमध्ये दिसतो. यात सलमानची नवीन हेअरस्टाइलही पाहावयास मिळते. या दोघांच्या सायकलवरील पोजमागचा आणखी एक उद्देश आहे. सायकलचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषण टाळा असा संदेश या करण-अर्जुन जोडीने फोटोमार्फत दिला आहे.


सलमान आणि शाहरुखने करण-अर्जुन, हम तुम्हारे है सनम, कुछ कुछ हौता है हे चित्रपट एकत्र केले आहेत. गेल्या काही वर्षांत या दोघांच्या मैत्रीत दुरावा आला होता. मात्र, इफ्तार पार्टीतील यांच्या गळाभेटीनंतर या दोघांचे मनोमिलन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:09 pm

Web Title: shah rukh khan salman khan enjoy bike ride together
Next Stories
1 मराठमोळा सलमान
2 चित्रपट रसिक विसरतील अशी भीती वाटत नाही – प्रियांका
3 मराठी चित्रपटात पुन्हा एकदा बॉलीवुडचा ‘सुलतान’?
Just Now!
X