‘मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं भारतीय आहेत’, असं वक्तव्य अभिनेता शाहरुख खानने केलं आहे. अलिकडेच त्याने डान्स प्लस ५ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने हे विधान केलं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच त्याने मुलांना आपला धर्म भारतीय आहे, असं देखील सांगितल्याचं यावेळी तो म्हणाला.

“एकदा सुहाना लहान असताना तिला एक फॉर्म भरायचा होता. यात तिला तिचा धर्म कोणता ही लिहायचं होतं. त्यामुळे तिने ‘पप्पा, आपण कोणत्या धर्माचे आहोत? ‘असा प्रश्न विचारला. त्यावेळी ‘आपण भारतीय आहोत. कोणताही धर्म नसतो आणि तो नसायलाही पाहिजे”, असं उत्तर शाहरुखने सुहानाला दिलं. ही आठवण शेअर करत त्याने “मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं भारतीय आहेत”, असं वक्तव्य केलं.

What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
shweta shinde and ashok saraf
“मेहनत आणि शिस्त…”, श्वेता शिंदेने सांगितला अशोक सराफ यांचा किस्सा; म्हणाली, “नाटकाच्या तालमीला…”
Female Student Death by Suicide
“सॉरी ताई..”, म्हणत १७ वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं, लैंगिक शोषण झाल्याचा आरोप
What Piyush Goyal Said?
भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’बाबत प्रश्न विचारताच पियूष गोयल यांनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ किस्सा

वाचा : ‘ऐका दाजीबा’मधील ही मुलगी आता कशी दिसते?

दरम्यान, शाहरुखच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर शाहरुखच्या नावाचा हॅशटॅगही सुरु झाला होता. सध्या शाहरुखचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. झिरो या चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटामध्ये झळकलेला नाही. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतूर झाले आहेत.