11 December 2017

News Flash

Video: शाहरुख खानला हा प्रश्न अनेकदा विचारला जातो

जाणून घ्या त्याचा मोबाइल नंबर

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 3:18 PM

शाहरुख खान

शाहरुख खानचे किती चाहते आहेत याची मोजणी न केलेलीच बरी. कारण त्याचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या व्यक्तींमध्ये शाहरुखचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. त्यामुळे इंटरनेटवर त्याच्याबद्दल सर्वाधिक सर्च केले जाते. शाहरुख नुकताच एका कार्यक्रमात मुलाखतीसाठी गेला असता त्याच्याविषयी सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्याला विचारण्यात आली.

असा साजरा केला कतरिनाने तिचा वाढदिवस

पण नेमकं शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्याविषयी काय जाणून घ्यायचं असेल असा प्रश्न खुद्द शाहरुखलाही पडला होता. तुम्हीही शाहरुखचे चाहते असाल आणि त्याचा फोन नंबर मिळावा अशी तुमची इच्छा आहे. तर अशी इच्छा असणारे तुम्ही काही एकटेच नाहीत. तुमच्यासारख्याच इतर चाहत्यांनाही बादशहाचा फोन नंबर मिळावा असे वाटते.

शाहरुखला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न त्याचा मोबाइल नंबर हा आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की ५५५९९६०३२१ या नंबरवर मध्यरात्री नंतर चाहते फोन करुन त्याच्याशी बोलू शकतात. जर त्याने फोन उचलला नाही तर ते मेसेजही टाकू शकतात. तो इमोजीचा वापर करुन त्यांच्या मेसेजना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. या प्रश्नाशिवाय खानला त्याच्यासंबंधित सर्वाधिक सर्च केले गेलेले प्रश्न विचारण्यात आले आणि त्याने त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली. जब हॅरी मेट सेजलमध्ये त्याच्या शरिरावर एक टॅटू दिसतो. पण खऱ्या आयुष्यात त्याच्या शरिरावर टॅटू आहे का? असा प्रश्न जेव्हा त्याला विचारला तेव्हा त्याचं उत्तर नाही असंच होतं. सिनेमाची गरज म्हणून तो टॅटू काढतो अन्यथा त्याला टॅटू काढायची भीती वाटते.

याशिवाय त्याच्याकडे खासगी जेट नाहीये. या व्हिडिओमध्ये शाहरुखने तो पहिल्यांदा गौरीला कुठे भेटला तेही सांगितले. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मासोबतचा त्याचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातले बटरफ्लाय हे गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले. लुधियानाच्या वेब मॉलमध्ये हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते.

सनी लिओनीच्या गाण्यावर क्रिस गेलने केला डान्स आणि म्हटले…

First Published on July 17, 2017 3:18 pm

Web Title: shah rukh khan shared his mobile number to his fans and said call me post midnight