बॉलीवूड बादशाहा शाहरुख खाने गेले कित्येक दिवस त्याच्या बंगल्याबाहेर असलेल्या अनधिकृत रॅम्पमुळे चर्चेत होता. अखेर गेल्या शनिवारी महापालिकेने त्या रॅम्पवर हातोडा चालविला. महापालिका रॅम्प तोडत असताना लोकांनी सदर भागात गर्दी केली होती. हे चित्र शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन आणि चिमुकला अब्रामदेखील आपल्या बंगल्याच्या बालकनीत उभे राहून पाहत होते. त्यांचे हे छायाचित्र फार कमी वेळातचं व्हायरल झाले. त्यानंतर शाहरुखने या छायाचित्रातून पत्नी गौरीला (गौरी छायाचित्रात पडद्यामागे उभी दिसते) वगळून सदर छायाचित्र ट्विट केले आहे.The long and short of it..truth has a beauty if it's own. pic.twitter.com/gijWSze7qC— Shah Rukh Khan (@iamsrk) February 15, 2015शाहरुखला याद्वारे नक्की काय सांगावयाचे आहे ते तर काही कळू शकले नाही. मात्र, लंबू आर्यन आणि छोटू अब्रामचे हे छायाचित्र शाहरुखच्या चाहत्यांना नक्कीचं पसंत पडले आहे.