अभिनेता शाहरूख खानचा चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, असे समीकरण आतापर्यंत तयार झाले होते. पण ‘फॅन’च्या प्रदर्शनानंतर त्याला काहीसे गालबोट लागल्याचे चित्र आहे. ‘फॅन’ शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली. पण त्यानंतर शनिवार आणि रविवार या दोन्ही सुटीच्या दिवशी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करता आली नाही. शनिवारच्या तुलनेत रविवारचा दिवस जरा बरा होत, असे आकडेवारीवरून दिसते. प्रदर्शित झाल्यावर पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने ५२.३५ कोटींची कमाई केली आहे.
‘फॅन’ची पाकिस्तानवासियांवर जादू, विक्रमी कमाई
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी चित्रपटाने १९.२० कोटींचा व्यवसाय केला. शनिवारी तो घसरून १५.४० कोटींपर्यंत खाली आला. तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडला जाईल, अशी शक्यता होती. पण रविवारी या चित्रपटाने केवळ १७.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने सर्वाधिक कमाई शुक्रवारीच केली, असे दिसते. या तीन दिवसांत मिळून ‘फॅन’ने ५२.३५ कोटींचा व्यवसाय केला आहे.
‘फॅन’टास्टिक शाहरूख!
अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली असतानाच प्रेक्षकांकडून त्याला समिश्र प्रतिसाद मिळतो आहे.