बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. या चित्रपटाला फक्त ६४ कोटींच्या आसपासच व्यवसाय करता आला. वितरकांना याचा मोठा फटका बसल्याने शाहरुख त्यांना नुकसानभरपाई देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ‘जब हॅरी मेट सेजल’ १०० कोटींचा गल्ला आरामात जमवेल अशी वितरकांना आशा होती. त्यामुळेच ‘एनएच स्टुडिओज’ने (NH Studioz) वितरणाचे हक्क मिळवण्यासाठी ८० कोटी रुपये गुंतवले. मात्र, शाहरुख आणि अनुष्का यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. त्यामुळे वितरकांनी शाहरूखकडे नुकसान भरपाई देण्याची विनंती केल्याचं म्हटलं जात आहे. याआधीही शाहरुखने त्याच्या ‘अशोका’, ‘पहेली’ आणि ‘दिलवाले’ या चित्रपटांचीही नुकसान भरपाई वितरकांना दिली होती.

Padman new poster: ‘ही’ अनोखी क्रांती घडवण्यासाठी अक्षय सज्ज

सलमान खाननेही त्याच्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या वितरकांना नुकसानभरपाई म्हणून काही रक्कम दिली होती. जवळपास ५० ते ५५ कोटी रुपये त्याने दिले होते. जेणेकरून त्यांचा तोटा भरुन निघेल.