News Flash

शाहरूख खान प्रथमच मराठी गाण्याच्या व्हिडिओत

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान पहिल्यांदाच मराठी गाण्यात दिसणार आहे. संगीतकार आणि गायक शेखर रावजियानी यांच्या 'सावली' या मराठी गाण्याच्या व्हिडिओत तो दिसणार आहे.

| June 19, 2013 02:42 am

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान पहिल्यांदाच मराठी गाण्यात दिसणार आहे. संगीतकार आणि गायक शेखर रावजियानी यांच्या ‘सावली’ या मराठी गाण्याच्या व्हिडिओत तो दिसणार आहे. या गाण्यात पहिल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. या गाण्याचा व्हिडिओ सुनिधी चौहान आणि शाहरूख खानवर चित्रित करण्यात आला आहे.  शाहरूख खान आणि शेखरची स्टुडिओत  भेट झाली, त्यावेळी शेखरने हे मराठी गाणे शाहरूखला ऐकवले. गाणे ऐकताच रोमान्सचा हा बादशहा गाण्याच्या प्रेमात पडला आणि क्षणार्धात त्याने या गाण्याच्या व्हिडिओमध्ये काम करण्यास होकार दिला. नटरंग चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या रवी जाधवने या व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांचे आहेत.
गाण्यातून मिळणारे उत्पन्न एका स्वयंसेवी संघटनेला दिले जाणार आहे. या कारणासाठी देखील शाहरूख या गाण्याचा हिस्सा बनण्यास तयार झाला. ‘परछायी तेरी सावलीसी, नटखट थोडी बावली’ असे या गाण्याचे शब्द आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 2:42 am

Web Title: shah rukh khan to make musical marathi debut
Next Stories
1 बॉलीवुडमध्ये काम करण्यास आवडेल- जॅकी चॅन
2 अनुष्का शर्मा करणार सलमान खानबरोबर रोमांस?
3 स्पॉट फिक्सिंग वादानंतर शिल्पा दिसली स्टार अवॉर्ड कार्यक्रमात
Just Now!
X