13 July 2020

News Flash

चाहत्यांना लवकरच अबरामची छायाचित्रे पाहता येतील- शाहरूख खान

अभिनेता शाहरूख खान अनेकदा प्रसारमाध्यमे, सोशल साईटसवर स्वत:च्या मुलांचे कौतूक करताना दिसतो. मात्र, खान कुटूंबातील नवा सदस्य अबराम याच्याविषयी शाहरूख फारसे बोलताना दिसत नाही.

| September 25, 2014 02:08 am

अभिनेता शाहरूख खान अनेकदा प्रसारमाध्यमे, सोशल साईटसवर स्वत:च्या मुलांचे कौतूक करताना दिसतो. मात्र, खान कुटूंबातील नवा सदस्य अबराम याच्याविषयी शाहरूख फारसे बोलताना दिसत नाही. चाहत्यांनी ट्विटरवर याविषयी शाहरूखला छेडले असता, आपण लवकरच अबरामचे छायाचित्र चाहत्यांसाठी प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले. सध्या शाहरूख खान वर्ल्ड टूरवर असला तरी, दररोज आपण मुलांच्या संपर्कात राहत असल्याचेही यावेळी त्याने म्हटले आहे. शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या या अपत्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. त्याच्या जन्मानंतर शाहरूखला बऱ्याच वादांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे शाहरूखने अबरामला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
मोठा मुलगा आर्यन, १३ वर्षाची मुलगी सुहाना आणि अबराम नावाचा छोटा मुलगा असलेला शाहरूख आपल्या मुलां प्रती अतिशय भावूक असून, त्यांची तो खूप काळजी घेत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी आर्यनला शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय शाहरूखने घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2014 2:08 am

Web Title: shah rukh khan to share son abrams picture with fans soon
Next Stories
1 स्त्री अंगप्रदर्शन हे भारतीय चित्रपटाचे अंगच
2 ऑस्करसाठी भारताकडून ‘लायर्स डाइस’ची निवड
3 ‘द शौकिन्स’ च्या निमित्ताने…
Just Now!
X