10 December 2018

News Flash

‘झिरो’वरून ट्रोल झाला सुपस्टार हिरो

हे गमतीशीर मीम्स नक्की पाहा..

शाहरुख खान

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शाहरुख खानने त्याच्या आगामी ‘झिरो’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या टीझरमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते किंग खानच्या लूकने. या चित्रपटात तो एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. पण याच गोष्टीवरून नेटकऱ्यांनी किंग खानला ट्रोल केलं आहे.

आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने शाहरुखला बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर मात्र याची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. त्याने राजपाल यादवचा चित्रपट हिसकावून घेतला की काय अशी प्रतिक्रिया एकाने दिली तर काहींनी त्याच्या भूमिकाची तुलना ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ या टीव्ही सीरिजमधल्या एका भूमिकेशी केली आहे. काही हास्यास्पद मीम्ससुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

VIDEO : ..जेव्हा ‘पॅडमॅन’ मराठीत गप्पा मारतो 

‘झिरो’ हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून यामध्ये अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘रांझना’, ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक आनंद एल राय याचे दिग्दर्शन करणार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

First Published on January 3, 2018 6:47 pm

Web Title: shah rukh khan trolled for his role in his upcoming movie zero