बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान यास चित्रपटसृष्टीतील योगदानाकरिता लंडन येथील एडिनबर्ग विद्यापीठाने ‘डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित केले आहे.

शाहरुखचे बॉलीवूडवर वर्चस्व असण्यामागचे कारण यावेळी त्याच्या भाषणातून उलगडले.  तो बॉलीवूडचा किंग खाननुसता नावाला नाही तर त्यामागे असेलेले त्याचे अथक परिश्रम आहेत. शाहरुखने यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्याने बॉलीवूडमधील त्याचा प्रवास उलगडलाचं पण त्याचसोबत त्याच्या काही चित्रपटातील अनुभव सर्वांना सांगितले. त्याने केलेले चित्रपट आणि त्यांच्या शिर्षकांमुळे त्याला मिळालेला धडा याविषयी तो आपल्या भाषणात बोलत होता. पण, केवळ भाषण देऊन गप्प बसेल तो किंग खान कसला?. त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटातील लुंगी डान्स या गाण्यावर नृत्य करून सर्वांचेच मनोरंजन केले.