बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा आजच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये मोडतो. तो केवळ अभिनेता नसून निर्मातादेखील आहे. रेड चिलीज ही त्याची वीएफएक्स कंपनी आहे. अशाप्रकारे त्याने विविध गोष्टींमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे शाहरुखच्या नावे कोट्यवधींची संपत्ती असेल यात शंका नाही. पण शाहरुखची ही संपत्ती त्याच्या मुलांना मात्र मिळणार नाही.

शाहरुखच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मृत्युनंतर तो आपल्या मुलांकरिता संपत्तीमध्ये केवळ चांगलं शिक्षण आणि घर याव्यतिरीक्त मागे काहीही सोडून जाणार नाही. हे स्वतः शाहरुखनेच एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तो म्हणालेला की, आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत. आम्ही अधिक पैशाची अपेक्षा करत नाही. जर आपल्याकडे पैसा असेल तर तो चांगले जीवन घालवण्यासाठी खर्च करावा यावर माझा आणि गौरीचा विश्वास आहे. पुढे तो म्हणाला की, मी कधीच पैशांची बचत केली नाही. जे काही कमवलं ते चित्रपटांच्या निर्मितीत आणि महत्त्वाच्या खर्चांमध्ये वापरले. त्यामुळे माझ्या मागे मुलांसाठी केवळ आमचं घरच राहिल.

वाचा : जाता-जाता दिव्या भारतीने या अभिनेत्राला केलं मोठी स्टार

आपल्यामागे मुलांसाठी घर सोडण्याविषयी शाहरुख म्हणाला की, मुंबईत येण्यापूर्वी माझ्याकडे घर नव्हते. त्यामुळे मी माझ्या मृत्यूपश्चात मुलांसाठी घर सोडून जाणार आहे. याव्यतिरीक्त त्यांना गरजेचे असे प्राथमिक शिक्षणही त्यांना देणार आहे. माझी मुलं त्यांच्यापरीने सर्वसाधारण आयुष्य जगतात. आम्ही त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करतो.

वाचा : .. या आयटम गर्लचे मानधन ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

शाहरुख आणि गौरी खानला तीन मुलं आहेत. १९९७ मध्ये त्यांचा मोठा मुलगा आर्यन याचा जन्म झालेला. २०१६मध्ये त्याने पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यांची दुसरी मुलगी सुहानाचा जन्म २००० साली झाला. सध्या ती धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. आर्यन आणि सुहाना या दोन मुलांनंतर या सेलिब्रिटी दाम्पत्याने सरोगसीद्वारे २०१३ साली आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अब्राम असे ठेवण्यात आले. छोटा अब्राम आपल्या वडिलांप्रमाणेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध आहे. अवघ्या चार वर्षांच्या अब्रामने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे.