अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘रईस’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अहमदाबादमध्ये गेला आहे. दरम्यान, आज पहाटे काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
शाहरुख खान एका हॉटेलमध्ये थांबलेला असताना आज सकाळी ५ वाजता त्याच्या गाडीवर दगडफेक झाली.याशिवाय त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच, दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या दोघांनी ‘जय श्री राम, शाहरुख खान हाय हाय‘ अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या महिन्याच्या सुरवातीलाच भुजमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ‘रईस’च्या चित्रीकरणाला विरोध केला होता.