News Flash

शाहरुख-सलमानचे पुन्हा मनोमिलन!

तेच स्थळ, तिच इफ्तार पार्टी आणि दोन प्रतिस्पर्धी खान- शाहरुख आणि सलमान.

| July 7, 2014 10:44 am

असं वाटतंय गेल्या वर्षी घडलेल्या गोष्टी पुन्हा घडत आहेत. तेच स्थळ, तिच इफ्तार पार्टी आणि दोन प्रतिस्पर्धी खान- शाहरुख आणि सलमान.
आधीचे चांगले मित्र नंतर शत्रू आणि आता पुन्हा मैत्री असे काहीसे समीकरण बॉलीवूडच्या दोन खानमध्ये पाहावयास मिळत आहे. बाबा सिद्दीकी यांनी दिलेल्या यंदाच्या इफ्तार पार्टीमध्ये शाहरुख आणि सलमानने पुन्हा एकदा गळाभेट घेतली. गेल्यावर्षी २१ जुलैला हे दोन्ही खानांनी एकमेकांची गळाभेट घेतली होती. हेच चित्र यंदाच्या इफ्तार पार्टीत पाहावयास मिळाले. केवळ दोघांचे कपडेच यात बदलले दिसले. सलमानने निळ्या रंगाचे शर्ट घातले होते तर शाहरुख काळे शर्ट आणि पोनी लूकमध्ये दिसला. यावेळी दोन्ही खानांनी हसत एकमेकांची गळाभेट घेतल्यावर बाबा सिद्दीकीसोबत फोटोसाठी एकत्र पोजही दिली.  
फोटो गॅलरी: शाहरुख-सलमानचे पुन्हा मनोमिलन!
गेल्या इफ्तार पार्टीत या दोघांमधील पाच वर्षांच्या वैरास पूर्णविराम लागला होता. मात्र, त्यानंतर हे दोघेही कुठेच एकत्र पाहायला मिळाले नाहीत. पण, शाहरुखची पत्नी गौरी ही सलमान आणि त्याच्या कुटुंबियांसोबत गेल्या वर्षी दिवाळी सेलिब्रेशनमध्ये दिसली होती. यावर्षी झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात सलमान आणि शाहरुख गळाभेट घेताना दिसले होते. २००८मध्ये अभिनेत्री कतरीना कैफच्या बर्थडे पार्टीत सलमान-शाहरुख यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्यानंतर या दोघांमध्ये खानवॉर सुरु झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 10:44 am

Web Title: shah rukh salman khan hug again at iftar party
टॅग : Bollywood,Salman Khan
Next Stories
1 “सॅटर्डे  संडे” ची पहिली झलक अनुराग कश्यपच्या हस्ते 
2 रोहित शेट्टीसोबत काम करण्याची आलियाची इच्छा
3 मराठीत पहिल्यांदाच सिक्वल कॉमेडी
Just Now!
X