News Flash

शाहरुख खानच्या लेकीने शेअर केला जिममधील हॉट फोटो, सुहानाचा फोटो पाहून चाहते घायाळ

सुहानाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केलाय.

(Photo-instagram@suhanakhan2)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. तेच सुहानाच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. बॉलिवूडमध्ये एण्ट्री करण्याआधीच सुहानाचे लाखो चाहते आहेत. सुहानाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केलाय. हा फोटो जिममधाला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होवू लागला आहे.

सुहाना खानने इन्स्टा स्टोरीला हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो मिरर सेल्फी असून यात सुहाना तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. या फोटोत सुहानाने जिमचे कपडे परिधान केल्याचं दिसतंय. फोटो शेअर करताच काही तासातंच सुहानाचा फोटो व्हायरल होवू लागला आहे.

suhana-khan-jym-photo (Photo-instagram@suhanakhan2)

हे देखील वाचा: कॉटन साडी…गॉगल्स आणि शूज; रशियाच्या रस्त्यांवर तापसीचा हटके लूक

काही दिवसांपूर्वीच सुहानाने तिचा वाढदिवस साजरा केलाय. यावेळी तिच्या बर्थ डे पार्टीच्या खास फोटोंनादेखील चाहत्यांची पसंती मिळाली असून हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

हे देखील वाचा: मुंबई पोलिसांनी शेअर केलं ‘द फॅमिली मॅन-२’मधील चेल्लम सरांचं मीम; ट्वीट पाहून चेल्लम सर म्हणाले…

सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. न्यूयॉर्कमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करतानाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तसचं सुहानाच्या बोल्ड फोटोची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. सुहान सध्या न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत असली तरी ती बॉलिवूडमध्ये केव्हा झळकणार यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 12:04 pm

Web Title: shaharukh khan daughter suhana khan share jym photo flaunt her toned body photo goes viral on social media kpw 89
Next Stories
1 कॉटन साडी…गॉगल्स आणि शूज; रशियाच्या रस्त्यांवर तापसीचा हटके लूक
2 Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स
3 मुंबई पोलिसांनी शेअर केलं ‘द फॅमिली मॅन-२’मधील चेल्लम सरांचं मीम; ट्वीट पाहून चेल्लम सर म्हणाले…
Just Now!
X