छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेखने गर्लफ्रेंड रुचिका कपूरशी लग्न केले आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांनी कोर्टात लग्नात केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शाहीर आणि रुचिका पुढच्या वर्षी जून महिन्यात पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शाहीर रुचिकाला डेट करत होता. कोर्टात लग्न केल्यानंतर शाहीर शेखने पत्नी रुचिकासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहीर आणि रुचिकासोबत अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर असल्याचे दिसत आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ShaheerianR (@shaheerian_r)

 

View this post on Instagram

 

A post shared by ShaheerianR (@shaheerian_r)

 

View this post on Instagram

 

A post shared by ShaheerianR (@shaheerian_r)

शाहीर हा मुळचा जम्मूचा आहे. लग्नानंतर शाहीर आणि रुचिका जम्मूला रवाना झाले आहेत. रुचिका ही क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहे. तिने ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘लैला मजनू’ या चित्रपटांसाठी निर्माती म्हणून काम केले आहे. तिने ‘मेंटल है क्या’, ‘जबरिया जोड़ी’, ‘डॉली किट्टी’, ‘वो चमके सितार’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे.