शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलिवूडमधल्या सुंदर जोडीपैकी एक मानले जातात. दोघांनीही नुकतंच एका मासिकासाठी पहिल्यांदा एकत्र फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहिद-मीराची जबरदस्त केमिस्ट्री यामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे भविष्यात या जोडीला रुपेरी पडद्यावरही एकत्र पाहायला त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.

काही दिवसांपूर्वी या फोटोशूटचे ‘बिहाईंड द सीन्स’ व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. मीराचं हे पहिलंच फोटोशूट असलं तरी तिने केलेल्या प्रयत्नांना पूर्णपणे यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही. करड्या रंगाच्या सूटमध्ये शाहिद तर हलक्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मीरा अत्यंत सुंदर दिसत आहेत. फोटोंमधील तिचे दागिनेही विशेष लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोशूटमधील इतरही फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतीलच.

https://www.instagram.com/p/Ba7Hv0FFdUW/

https://www.instagram.com/p/Ba7Hc1VlFkK/

वाचा : जगातील सर्वांत उंच इमारतीवर प्रभास करणार साहसदृष्ये

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये मीरा आणि शाहिद एकत्र दिसले होते. इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावेळीही मीरा कॅमेरासमोर अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसली. चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये.

https://www.instagram.com/p/Ba7G_k5lj3v/