बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत हे आई-बाबा झाले आहेत. अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीराने काल २६ ऑगस्ट रोजी छोट्या परिराणीला जन्म दिला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मीरा राजपुतने त्यांच्या बाळाला जन्म दिल्याचे कळते.
मीरा राजपुत हिला मुंबईतील खार परिसरात असलेल्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी मीरा राजपूतसोबत शाहिदही उपस्थित होता. काल सायंकाळी रात्री आठच्या सुमारास मीराने एका नन्ह्या परीला जन्म दिला आहे. बाळाचं वजन २.८ किलो असून दोघेही सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात स्वत: शाहिद कपूरने ट्विट केलं. ती आलीयं आणि आमचा आनंद वर्णन करण्यासाठी आता शब्दही कमी पडू लागले आहेत. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, या शब्दांत आभार मानत शाहिद कपूरने आपल्या मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त केला. शाहिदच्या या ट्विटरवर अभिनेत्री कतरिना कैफ आणि प्रिती झिंटा यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. शाहिद आणि मीराच्या पहिल्या बाळाच्या आगमनानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचा विवाह सोहळा गेल्या वर्षी ७ जुलै रोजी पार पडला होता. त्यांच्या रिसेप्शनला बॉलीवूडमधील सर्व नामवंतर व्यक्तींनी हजेरी लावली होती.
She has arrived and words fall short to express our happiness. Thank you for all your wishes.
— Shahid Kapoor (@shahidkapoor) August 26, 2016
Congratulationssssssss to the most amazing couple @shahidkapoor @MiraRajput !!!!! Can’t wait to see this beautiful baby girl!!!!❤️❤️❤️💃💃
— Alia Bhatt (@aliaa08) August 26, 2016
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 7:55 am