News Flash

पुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा

अनेकदा मला मीशासाठी वाटते की, अभिनय सोडून मी दुसरं काही तरी करावं. मला नाही वाटत तिने हे सारं सहन करावं. लहान मुलांसाठी हे योग्य नाहीये.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत मुलगी मीशासोबत

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर आणि मीरा राजपूत पुन्हा एकदा आई- बाबा होणार आहेत. हे आम्ही नाही तर खुद्द शाहिदनेच सांगितले आहे. शाहिदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मीशाचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मीशा आनंदात दिसत आहे. तिच्या बाजूला चॉकने रंगीबेरंगी फुग्यांचे चित्र काढले आहे. या फुग्यांच्या वरती मोठी बहिण असे लिहिलेली आहे. यावरूनच लवकरच कपूरांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार हे नक्की. या फोटोला कॅप्शन देताना शाहिदने फक्त हार्ट हे इमोजी वापरले आहे.

काही दिवसांपूर्वी मीराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये बेबी बंप स्पष्ट दिसत होता. यामुळे मीरा पुन्हा एकदा आई होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तेव्हा शाहिद आणि मीरा दोघांनीही याबद्दल स्पष्टपणे काहीही सांगितले नव्हते. पण आता शाहिदनेच मीशाचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सारे काही स्पष्ट केले आहे असेच म्हणावे लागेल.

‘पद्मावत’ स्टार शाहिद कपूरने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, ‘मी फार नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात मीशा आली. पण मीशासोबत जे काही ग्लॅमर जोडले गेले आहे ते पाहून मला फार वाईट वाटते. तिने स्वतःहून अशा ग्लॅमरस आयुष्याची निवड केलेली नाही. तिचा यात काय दोष आहे. अनेकदा मला मीशासाठी वाटते की, अभिनय सोडून मी दुसरं काही तरी करावं. मला नाही वाटत तिने हे सारं सहन करावं. लहान मुलांसाठी हे योग्य नाहीये.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 12:00 pm

Web Title: shahid kapoor confirms the good news wife mira rajput is pregnant again posted a cute pic of misha kapoor
Next Stories
1 अनोख्या रंगसंगतीने खुललं ‘रणांगण’
2 जगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन
3 Top 10 News : ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातील वादांपासून ‘ऑक्टोबर’च्या वाटेतील अडचणीपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर
Just Now!
X