बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर लवकरच ‘जर्सी’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने एक आवाक् करणारा खुलासा केला. या चित्रपटातील दृश्य पाहून त्याला अक्षरश: रडू कोसळते.

शाहरुखचे चित्रपट पाहून अभिनय शिकणारा झाला देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

हा चित्रपट क्रिकेटवर आधारित असलेल्या ‘जर्सी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात एका ३६ वर्षीय क्रिकेट खेळाडूचे आयुष्य दाखवण्यात आले आहे. त्याच्यावर एका सहा वर्षांच्या मुलाची जबाबदारी आहे. व आपल्या मुलासाठी तो पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात करतो. क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना त्याच्या आयुष्यात आलेले विविध अडथळे पाहून शाहिदला अक्षरश: रडू कोसळते.

 

View this post on Instagram

 

#jersey #prep

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

काय म्हणाला शाहिद?

बोल्ड मलायका आहे ‘न्यूड योगा गर्ल’ची फॉलोअर

मी ‘कबिर सिंग’ या चित्रपटानंतर कुठलाही रिमेक न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ‘जर्सी’ या चित्रपटाची पटकथा वाचून मी भारावून गेलो. या कथानकात मी इतका एकरुप झालो, की यातील व्यक्तिरेखा माझ्या सभोवताली मला दिसू लागल्या. तो क्रिकेटर मीच आहे असा मला भास होऊ लागला. एडिटिंगदरम्यान मी या चित्रपटातील प्रत्येक दृश्य अनेकदा पाहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा मी त्या क्रिकेट खेळाडूचा संघर्ष पाहिला तेव्हा तो संघर्ष जणू माझाच आहे असे वाटून मला रडू येत असे. असे शाहिद या मुलाखतीत म्हणाला. ‘जर्सी’ हा चित्रपट ऑगस्ट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.