News Flash

शाहिद कपूरमुळे ‘पद्मावती’चे युद्ध थांबले

दोघंही लढाईत परस्परांपुढे उभे ठाकतात

शाहिद कपूर

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ सिनेमाची संकटं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. एका संकटावर मात करून भन्साळी पुढे जातात न जातात तोच दुसरं संकट डोकं वर काढून उभं राहिलेलं असतं. पद्मावतीच्या चित्रीकरणामध्ये आता आणखीन एक अडचण समोर येऊन उभी राहिली आहे.

महिमा चौधरीच्या भावाचा आणि वहिनीचा अपघातात मृत्यू

‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने काही संघटनांनी सिनेमावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे राजस्थान येथील चित्रीकरणा दरम्यान सेटचे मोठ्या प्रमाणात नुकसानही करण्यात आले होते. असाच काहीसा प्रकार कोल्हापूर येथेही घडला. येथे तर सेटला आग लावण्याचाच प्रयत्न करण्यात आला होता. या सगळ्या संकटांवर मात होतेय न होतेय तर आता शाहिद कपूरमुळे चित्रीकरण थांबवण्याची वेळ आली आहे.

तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल पण असंच काहीसं सध्या झालं आहे. शाहिदमुळे सिनेमाचे चित्रीकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’त शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांचे एक दृश्य चित्रीत करायचे होते. या दृश्यात हे दोघंही लढाईत परस्परांपुढे उभे ठाकतात. आता युद्धाचे चित्रीकरण आहे म्हटल्यावर त्यासाठी पिळदार देहयष्ठी तर हवीच ना.. रणवीरला यासाठी फारशी मेहनच घ्यावी लागली नाही, कारण त्याचे शरीर पहिल्या काही भूमिकांमुळे आधापासूनच पिळदार होते.

यशस्वी अभिनेत्री बनू शकली नाही म्हणून ती बनली चक्क पोकर प्लेअर

शाहिदला मात्र त्याच्या शरीरावर फार काम करावे लागणार होते. या दृश्याच्या चित्रीकरणासाठी योग्य अशी शरीरयष्ठी शाहिदची नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या दृश्याचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. म्हणजे आता यापुढे शाहिद जीममध्ये जाऊन घाम गाळणार आणि त्यानंतर तो पिळदार शरीरयष्ठी कमवणार. या सगळ्याला किती वेळ लागेल हे तर आता शाहिदही सांगू शकत नाही. शाहिद या सिनेमात पद्मावतीचा पती राजा रतन सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 10:18 pm

Web Title: shahid kapoor delays padmavati shoot read details
Next Stories
1 यशस्वी अभिनेत्री बनू शकली नाही म्हणून ती बनली चक्क पोकर प्लेअर
2 Jagga Jasoos Trailer: रागात कतरिनाने रणबीरच्या कानशिलात लगावली
3 महिमा चौधरीच्या भावाचा आणि वहिनीचा अपघातात मृत्यू
Just Now!
X