13 November 2019

News Flash

कबीर सिंगच्या प्रदर्शनादरम्यान शाहिदची चित्रपटगृहात एण्ट्री

शाहिदला चित्रपटगृहामध्ये पाहताच चाहत्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसत आहे

कबीर सिंग

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट शाहिदच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चाहत्यांचा चित्रपटाबाबतचा उत्साह पाहण्यासाठी खुद्द कबीर सिंग उर्फ शाहिद कपूर चित्रपटगृहामध्ये पोहोचला आहे.

शाहिदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिद कपूर ‘कबीर सिंग’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अचानक चित्रपटगृहामध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. शाहिदला चित्रपटगृहामध्ये पाहताच चाहत्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. शाहिद चाहत्यांचे आभार मानत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगाने केले आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

First Published on June 25, 2019 4:50 pm

Web Title: shahid kapoor enter in theater while screening of kabir singh avb 95