24 September 2020

News Flash

‘दादासाहेब फाळके एक्सेलन्स’ पुरस्कारांनी सन्मानित झाला ‘हा’ ‘पद्मावत’ स्टार

लोकांना जेव्हा कळलं की पद्मावत सिनेमात मीही आहे, तेव्हा अनेकांनी मी पाहुण्या कलाकाराची भूमिका करतोय का असा प्रश्नही विचारला

बॉलिवूडचा स्टार शाहिद कपूरला पद्मावत सिनेमात जबरदस्त परफॉर्मन्स देण्यासाठी दादासाहेब फाळके एक्सेलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सिनेमात शाहिदने महारावल रतनसिंह ही व्यक्तिरेखा साकारली होती. समिक्षकांसोबतच प्रेक्षकांनाही शाहिदची ही भूमिका फार पसंत पडली होती. म्हणूनच शाहिदचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

पुरस्कार मिळाल्यावर शाहिद म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर अशा व्यक्तिरेखांना प्रेक्षकांकडून आणि समिक्षकांकडून मिळालेली दाद फार भारावून टाकणारी आहे. हा सिनेमा फक्त तिघांसाठीच होता तो म्हणजे मी आणि रणवीर- दीपिका. आम्ही साकारलेली भूमिका फारच कठीण होती.’ काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत शाहिद म्हणाला होता की, ‘लोकांना जेव्हा कळलं की पद्मावत सिनेमात मीही आहे, तेव्हा अनेकांनी मी पाहुण्या कलाकाराची भूमिका करतोय का असा प्रश्नही विचारला. पण तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. सिनेमाच्या प्रदर्शनानंतरही अनेक दिवस मी गप्पच होतो. कारण लोकांना माझं काम दिसत होतं.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 2:08 pm

Web Title: shahid kapoor got dadasaheb phalke excellence award for best actor in movie padmavat here is the reaction of shahid kapoor
Next Stories
1 बिग बॉसच्या घरात जेव्हा होते शरद उपाध्येंची एण्ट्री
2 युद्धभूमी सज्ज! ‘इन्फिनिटी वॉर’ची उत्सुकता शिगेला
3 ‘न्यूड’ सत्य
Just Now!
X