27 January 2021

News Flash

शाहिदला येतीये ‘जर्सी’च्या सेटची आठवण; शेअर केला ‘खास’ फोटो

पाहा, शाहिदचा नवा लूक

संपूर्ण जगावर करोनाचं संकट असल्यामुळे देशातही लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाउनच्या काळात सारं काही बंद असल्यामुळे अनेक चित्रपटांचं चित्रीकरणही रखडलं आहे. यामध्येच बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्या आगामी ‘जर्सी’ या चित्रपटाचं चित्रीकरणही अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळे सध्या घरात बसून शाहिदला त्याच्या चित्रीकरणाच्या सेटची आठवण येतं आहे. म्हणूनच त्याने जर्सीमधील त्याचा एक लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शाहिदने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात शाहिद क्रिकेटपटूच्या रुपात दिसत आहे. त्याच्या हातात बॅट असून त्याने हॅल्मेट घातलं आहे. ‘जर्सी सेट…मी प्रचंड मिस करतोय’, असं कॅप्शन शाहिदने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

#Jersey sets. #imissyou

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिदचा हा नवा चित्रपट ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. विशेष म्हणजे या हिंदी रिमेकचं नावदेखील ‘जर्सी’च ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटात शाहिद मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी शाहिदने ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय. अलिकडेच शाहिदची मुख्य भूमिका असलेला कबीर सिंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर शाहिदच्या लोकप्रियतेत कमालीची वाढली आहे. त्यामुळेच त्याने मानधनाचा आकडाही वाढविल्याचं म्हटलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 5:43 pm

Web Title: shahid kapoor misses jersey movie set look ssj 93
Next Stories
1 भारतात लॉकडाउन सुरु असताना सनी लिओनी पोहचली अमेरिकेत, ‘हे’ आहे कारण
2 ‘तुमचे दात तुटल्यास मला दोष देऊ नका’; मिलिंद सोमणचा अतरंगी वर्कआऊट व्हिडीओ
3 तारक मेहतामधील या कलाकाराला सुरुवातीला ३ रुपयांसाठी करावे लागत होते अनेक तास काम
Just Now!
X