News Flash

शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम यांचा खुलासा, म्हणाली दोन्ही लग्न ..

दुसरं लग्न टिकू शकलं असतं जर...

बॉलिवूड म्हंटलं तर अफेर्स, ब्रेकअप, अनके लग्न आणि चर्चा या आल्याचं. बॉलिवूडमध्ये अशा सेलिब्रिटींची कमी नाही ज्यांनी एकाहून अधिक लग्न केली आहेत. अभिनेता शाहिद कपूर आणि ईशान खट्टरची आई नीलिमा अजीम यांनीदेखील दोन विवाह केले असून दोन्ही लग्न अपयशी ठरली आहेत.

नुकत्याच बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत नीलिमा अजीम यांनी त्यांच्या दोन विवाहांबद्दल खुलासा केला आहे. शाहिदचे वडील अभिनेता पंकज कपूर यांच्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “माझ्याकडे एक चांगला मित्र होता ज्याच्यासोबत माझं लग्न झालं. सगळं काही ठिक होतं. माझे कुटुंबीय चांगले होते. आजुबाजुला कायम चांगले लोक राहिले. मला कल्पनाच नव्हती की जीवनात सगळं सुरळीत सुरु असताना अचानक पाय घसरेल आणि मी खाली पडेन. शिवाय नकार देण्याचा काही प्रश्नच येत नाही, सगळ्यांना मी आवडत होते. सगळे मला फॉलो करत होते. तर जेव्हा मी तरुण आणि आनंदी होते तेव्हा पहिल्यांदा मी दु:ख, नकार, असुरक्षितता या भावनांना सामोरी गेले. ”

राजेश खट्टर यांच्यासोबतही नात्यांचा गुंता

तर राजेश खट्टर यांच्यासोबतच्या नात्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या,” दुसरं लग्न टिकू शकलं असतं जर काही गोष्टी घटल्या नसत्या. मात्र त्या गोष्टींकडे दूर्लक्ष करणं कठीण आणि अशक्य होतं. जर थोडं नियंत्रण, लॉजिक आणि सेन्स असता तर टिकू शकलं असतं. मात्र असं झालं नाही. मुंबईमध्ये अशा या गोष्टी संघर्ष आणि सगळ्या दबावामुळे होतात. सर्वांना यापुढे झुकावं लागतं. मात्र माझ्याकडे पुन्हा उभं राहण्याची क्षमता आहे. शिवाय माझ्याकडे माझी शाहिद आणि ईशान ही दोन मुलं आहे. ती माझ्यासाठी प्रेरणा आहेत.” असं म्हणत परिस्थितीमुळे दोन्ही लग्न टिकणं कठीण झाल्याचं त्या म्हणाल्या.

यावेळी राजेश खट्टरसोबत आपली अजूनही मैत्री असल्याचं नीलिमा यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 4:51 pm

Web Title: shahid kapoor mother neelima azeem says why both marriages failed kpw 89
Next Stories
1 कंगनाने चाहत्यांना दिल्या गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा
2 कार्तिक आर्यन म्हणतो, “मी उठू की लॉकडाऊन लागणार आहे?”
3 ‘बिग बुलचा चांगला रिव्ह्यू देण्यासाठी अभिनेत्रीला पैसे दिले का?’ म्हणणाऱ्याला अभिषेकचे भन्नाट उत्तर
Just Now!
X