07 August 2020

News Flash

बायकोसोबतच्या भांडणांबद्दल शाहिद कपूर म्हणतो..

संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच, नवरा बायकोत कधी ना कधी खटके उडणारच. मग याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात.

संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच, नवरा बायकोत कधी ना कधी खटके उडणारच. मग याला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नसतात. एका मुलाखतीत अभिनेता शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपूतशी होणाऱ्या वादविवादाविषयी, भांडणांविषयी सांगितलं होतं.

‘बायकोसोबत माझी जेव्हा कधी भांडणं होतात, तेव्हा मला काय करावं हे सुचतच नाही. भांडणांचा त्रास मला नक्कीच होतो आणि त्यातून सावरण्यासही वेळ लागतो. दोन महिन्यांतून एकदाच असं काहीतरी आमच्यात भांडण होतं पण मग ते १५ दिवस सुरूच राहतं,’ असं शाहिद म्हणाला होता. शाहिद व मीराच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली. साथीदारासोबत असलेल्या मतभेदांबद्दल तो पुढे म्हणाला, ‘भांडण होणं ही चांगलीच गोष्ट आहे. एकमेकांच्या मताशी सहमत नसणं स्वाभाविक आहे. पण एकमेकांच्या स्वभावाला स्वीकारणं आणि त्यातून समस्या सोडवणं महत्त्वाचं आहे. त्या सोडवून पुढे जाणं महत्त्वाचं आहे.’

शाहिद व मीराला एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलीचं नाव मीशा तर मुलाचं नाव झैन आहे. शाहिदचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा रिमेक आहे. या चित्रपटात शाहिदसोबत कियारा अडवाणीची मुख्य भूमिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 1:16 pm

Web Title: shahid kapoor on fights with wife mira rajput ssv 92
Next Stories
1 “करोनावर कशी केली मात?” टॉम हँक्स यांनी सांगितला थक्क करणारा अनुभव
2 बिकिनीमधील फोटो शेअर करत सोनाली म्हणते…
3 ‘एक महानायक बी. आर. आंबेडकर’ मालिकेतील कलाकाराला करोनाची लागण; थांबवलं शूटिंग
Just Now!
X