23 October 2019

News Flash

‘ब्रेकअप झाल्यानंतर आयुष्यच बेरंग झालं होतं,’ करिनाच्या आठवणीत शाहिद भावूक

बॉलिवूडमधील 'हॉट टॉपिक' म्हणून शाहिद आणि करिनाकडे पाहिलं जायचं

शाहिद कपूर

कधी काळी बॉलिवूडमधील ‘हॉट टॉपिक’ म्हणून अभिनेता शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या रिलेशनशीपकडे पाहिलं जायचं. मात्र काही कारणास्तव या नात्यामध्ये कटूता आली आणि हे दोघं विभक्त झाले. त्यानंतर या दोघांनी शक्यतो एकमेकांसमोर येणं टाळलं. दोघांनीही त्यांच्या करिअरवर फोकस केलं. शाहिद लवकरच ‘कबीर सिंह’ या चित्रपटात झळकणार असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या प्रसंगी शाहिद जुन्या आठवणीत रमला असून करिनाच्या आठवणीमध्ये तो भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

शाहिदचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिद एका प्रेमभंग झालेल्या प्रियकराची भूमिका वठवत आहे. त्याच्या या भूमिकेविषयी विचारत असताना माध्यमांनी ‘खऱ्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले आहेत का ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने ‘प्रेमभंगानंतर आयुष्य बेरंग झाले होते. कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हतं’, असं उत्तर दिलं. त्याच्या या उत्तरामुळे त्याने थेट करिना कपूरसोबत असलेल्या प्रेमसंबंधांकडे इशारा केल्याचं जाणवलं.

‘दिल टुटने के बाद जिंदगी बेरंग हो गई थी, कुछ भी अच्छा नही लग रहा था’, असं वक्तव्य शाहिदने यावेळी केलं. त्याने हे वक्तव्य करून त्याच्या आणि करिना कपूरच्या नात्यातील आठवणींना उजाळा दिला.

वाचा : गोडसेबाबत ‘त्या’ वक्तव्यामुळे कमल हासन यांना जीवे मारण्याची धमकी

‘कबीर सिंह’ हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. आता या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ ला प्रदर्शित होत आहे. चित्रपटात शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कियाराने या आधी ‘एम.एस. धोनी’, ‘लस्ट स्टोरी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कियारा आणि शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

 

First Published on May 14, 2019 12:14 pm

Web Title: shahid kapoor open up about heartbreak with kareena kapoor at kabir singh trailer launch