News Flash

Video : शाहिद कपूरला हे काय झालं?

शाहिदला झाकावा लागला चेहरा

२०१८ साली शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळविली. इतकंच नाही तर या चित्रपटानंतर शाहिदची चॉकलेट बॉय ही इमेज बदलून गेली. ‘कबीर सिंग’नंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. सध्या तो आगामी ‘जर्सी’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. मात्र या चित्रपटाच्या सेटवर शाहिद गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या शाहिदच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाचं चंदीगढमध्ये चित्रीकरण सुरु असून या सेटवर शाहिदच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे चित्रीकरण अर्धावर सोडून त्याला मुंबई गाठावी लागली आहे. अलिकडेच शाहिद आणि मीराला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं असून यावेळी शाहिदने त्याचा चेहरा झाकला होता.

 

View this post on Instagram

 

Injured #shahidkapoor returned home tonite with wifey #mirakapoor with a mask on #airportdiaries #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


सूत्रांच्या माहितीनुसार, शाहिदच्या ओठांवर आणि हनुवटीला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याचा चेहरा सुजला आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचताच शाहिदने त्याचा चेहरा झाकून घेतला. ‘जर्सी’ या चित्रपटामध्ये शाहिद एका क्रिकेटपटूची भूमिका साकारत असून या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो क्रिकेटचा सराव करत होता. मात्र याच दरम्यान त्याला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सध्या त्याला आरामाची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान,’जर्सी’ हा तेलुगू चित्रपटाचा रिमेक असून या त्याचं दिग्दर्शन गौथम तिन्नानूरी यांनी केले आहे. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटाच्या रिमेकचे दिग्दर्शनही तेच करणार आहेत. ‘जर्सी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक २८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी काही दिवसापूर्वी दिली होती. या चित्रपटासाठी शाहिदने ३५ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 5:13 pm

Web Title: shahid kapoor returns back to mumbai with wife mira kapoor after injury on the sets of jersey ssj 93
Next Stories
1 ‘कुलवधू’नंतर पुन्हा जमणार सुबोध -पूर्वाची जोडी
2 फरहान-शिबानी बांधणार लग्नगाठ? जावेद अख्तर म्हणाले…
3 फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
Just Now!
X