News Flash

VIDEO: शाहिदने केली मीराची नक्कल

शाहिद- मीरा ही जोडी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने पत्नी मीरा राजपूतसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद पत्नी मीराची नक्कल करताना दिसतो. यापूर्वी शाहिदने पत्नी मीरासोबत फिल्मफेअर पुरस्काराचा फोटो शेअर केला होता. शाहिदसोबत लग्न केल्यानंतर मीरा प्रसारमाध्यमांच्या समोर आली नव्हती. मात्र करण जोहरने आपल्या लोकप्रिय कार्यक्रमातून कॉफीच्या बहाण्याने शाहिद-मीराला पहिल्यांदा एकत्र आणल्याचे पाहायला मिळाले होते. बॉलिवूडमध्ये फारसा रस नसणाऱ्या मीराने करणच्या लोकप्रिय कार्यक्रमातून शाहिदसोबत छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या कार्यक्रमात शाहिदचे भरभरुन कौतुक करताना मीराने त्याच्यातील वाईट सवयी देखील सांगितल्या होत्या.

मीराला बॉलिवूडशी संबंधित कोणत्याच गोष्टीत रस नव्हता. जेव्हा शाहिद- मीरा यांचे लग्न ठरवण्यात आले तेव्हा ते दोघांसाठीही थोडे अवघड गेले. त्यांनी साधारणपणे ७ तास एकत्र घालवले. या भेटीत एकमेकांच्या आयुष्याबद्दल बोलत असताना कोणत्या गोष्टी आवडतात, काय आवडत नाही याबद्दल चर्चा केली. निघताना त्या दोघांनाही परत एकदा भेटण्याचे ठरवले. शाहीदने मीराला त्यांच्यातल्या वयात असलेल्या अंतराबद्दल विचारले. तेव्हा मीराने तेवढ्याच आत्मविश्वासाने त्याला प्रतिप्रश्न केला की, ‘तुला तुझ्याहून १३ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत लग्न करायला आवडेल का?’ अशा शाहिद-मीराच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनुभविल्या आहेत. त्यांचे हे किस्से शाहिद आणि मीरा हे बॉलिवूडमधील गोड कपल असल्याचे सिद्ध होते. एवढेच नाही तर काही दिवसांपूर्वीच शाहिदने व्यग्र कामातून पत्नी मीरासाठी वेळ देऊन ‘परफेक्ट’ पती असल्याचे उदाहरण दाखवून दिले आहे. शाहिद आणि  त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से यापूर्वी देखील चर्चेत आले आहेत.  शाहिदने पद्मावतीच्या व्यग्र कामातून वेळ काढून पत्नी मीरासाठी वेळ दिला होता. मुंबईमधील वांद्रा कॅफेमध्ये ही जोडी एकत्र वेळ घालविताना दिसली होती.

विशाल भारद्वाज यांच्या आगामी रंगून चित्रपटामध्ये शाहिद कपूर दिसणार असून याव्यतिरिक्त संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 9:52 pm

Web Title: shahid kapoor shared wife mira funny video
Next Stories
1 …म्हणून यामीला ह्रतिक ‘काबिल’ वाटतो
2 सिद्धार्थने पुन्हा एकदा दाखवून दिले आलिया प्रेम
3 हॉलिवूड गर्ल दीपिकाला सोनम कपूर ओळखत नाही
Just Now!
X