14 December 2017

News Flash

चाहत्यांना नाही भावला राजा रावल रतन सिंहचा लूक

सोशल मीडियावर टीकांचा भडीमार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 6:43 PM

शाहिद कपूर

गेल्या काही दिवसांपासून सर्वांत जास्त कोणत्या चित्रपटाची चर्चा होत असेल तर तो आहे ‘पद्मावती’. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर्स पाहून चाहत्यांमधील प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. राणी पद्मावतीच्या भूमिकेतील दीपिका पदुकोण, राजा रावल रतन सिंहच्या लूकमध्ये शाहिद कपूर आणि अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत रणवीर सिंगला पाहून सर्वजण थक्कच झाले. त्यानंतर नुकतंच शाहिदने तो साकारत असलेल्या भूमिकेतील आणखी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या फोटोवरील कमेंट्स पाहता चाहत्यांना हा लूक आवडला नसल्याचं दिसून येतंय.

इन्स्टाग्रामवर शाहिदने हा फोटो पोस्ट केल्यानंतर काहींनी त्याची स्तुती केली. पण बऱ्याच लोकांनी त्यावर टीकाही केली. फोटोमधील शाहिदचा शर्टलेस अवतार चाहत्यांना भावला नसल्याचं दिसून आलं. त्याच्या शरीरयष्टीवरूनही अनेकांनी कमेंट्स केले. या फोटोवर एकाने, ‘भयानक लूक’ असं कमेंट केलं तर एकाने, ‘तुझ्या शरीरयष्टीवर अजून मेहनत घेण्याची गरज आहे’ असा सल्लाही दिला.

Still waters run deep. He will rise on the 1st of December. Wait for it. #rajputpride

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

Firangi motion poster: कपिलने ‘फिरंगी’ला मारली लाथ

ऐतिहासिक भूमिका साकारण्याची शाहिदची ही पहिलीच वेळ असल्यामुळे त्याने आपलं सर्व कौशल्य या व्यक्तिरेखेसाठी पणाला लावलं आहे. त्यामुळे शाहिदने राजा रावल रतन सिंहच्या भूमिकेला किती न्याय देऊ शकला, हे या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल. १ डिसेंबर रोजी ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

First Published on October 12, 2017 6:43 pm

Web Title: shahid kapoor shirtless look in padmavati did not go well with fans