News Flash

‘पद्मावती’सोबत व्यग्र असणाऱ्या शाहिदचे पत्नीसोबतचे गोड क्षण

करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये शाहिद आणि मीरा दिसणार आहेत.

शाहिद कपूर आणि मीरा

शाहिद कपूर सध्या संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यात तो दीपिका पदुकोणच्या पतीच्या म्हणजेच राजा रतन सिंगच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘पद्मावती’च्या सेटवर आपल्याला रणवीर आणि शाहिद यांच्यारुपात एक चांगला बॉयफ्रेंड आणि एक चांगला पती अशी दोन उदाहरणे पाहायला मिळतात. दोन चर्चित कलाकारांपैकी पद्मावतीच्या चित्रकरणात व्यस्त असणाऱ्या शाहिदने व्यावसायिक आणि खासगी आयुष्य यात उत्तम समतोल साधत आपल्या पत्नीसाठी वेळ काढला. शाहिदने व्यस्त कामातून पत्नी मीरासाठी वेळ देऊन ‘परफेक्ट’ पती असल्याचे उदाहरण दाखवून दिले आहे. शाहिद आणि मीरा बॉलिवूडमधील गोड जोडप्यापैकी एक मानले जाते. त्यांच्या प्रेमाचे अनेक किस्से यापूर्वी देखील चर्चेत आले आहेत. या चर्चेत आता शाहिदने पद्मावतीच्या व्यस्त कामातून वेळ काढून मीरासाठी वेळ दिला. मुंबईमधील बांद्रा कॅफेमध्ये ही जोडी एकत्र वेळ घालविताना दिसली.

शाहिद आणि मीरा मुलगी मीशाच्या जन्मानंतर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात एकत्र दिसलेले नाहीत.  आगामी काही दिवसात हे जोडपं एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहे. मीरा लवकरच शाहिदसोबत छोट्या पडद्यावर झळकणार आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानंतर आता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत येणार आहेत.कॉफी विथ करणचा हा भाग डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तेव्हाच शाहिदच्या ‘पद्मावती’ सिनेमाचे पहिल्या सत्राचे चित्रिकरणही पूर्ण होईल.

‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जोरदार तयारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या कथानकाची गरज पाहता संजय लीला भन्साळी या चित्रपटाबाबत जास्तच काळजी घेत आहेत. एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, राणी पद्मावती, मेवाडचे राणा रतन सिंग यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात येणार आहेत. ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये १३ ते १४ व्या शतकातील काळाचे चित्रण साकारण्यात येणार आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहिद कपीर यांच्या या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिदने त्याच्या लूक्सवर फार मेहेनत घेतली आहे. २०१७ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 8:27 pm

Web Title: shahid kapoor takes time off padmavati for a date with wife mira
Next Stories
1 शिवाजी नाट्यमंदिरात ‘रेडिओवाणी’ची अविस्मरणीय मैफिल!
2 बानीच्या प्रियकराने आगळ्या पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
3 …म्हणून परिणीतीने आदित्यला मारला टोमणा