News Flash

‘अर्जुन रेड्डी’ म्हणतोय ‘मी का बघू कबीर सिंग?’

मी स्वतः या चित्रपटात काम केलंय तर मी पुन्हा हा चित्रपट का बघू ?

शाहिद कपूरचा चित्रपट ‘कबीर सिंग’ची प्रदर्शित झाल्यापासून खूप चर्चा आहे. या चित्रपटातल्या शाहिदच्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. या चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये अभिनेता विजय देवरकोंडाने प्रमुख भूमिका केली होती.

एका वृत्तानुसार, ‘डीयर कॉमरेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजयला ‘कबीर सिंग’बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला की, “त्या चित्रपटात शाहिदने काम केले आहे. ती भूमिका तो जगला आहे. मला असं वाटतं की, या चित्रपटात मी बघावं असं काही नाहीये. मला चित्रपटाचे कथानक माहिती आहे. मी स्वतः या चित्रपटात काम केलंय तर मी पुन्हा हा चित्रपट का बघू ?”

‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते. या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा केले आहे. शाहिद कपूर व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ थोडी हटके प्रेमकहाणी सांगतो. संपूर्ण चित्रपटात शाहिद कपूरचं उत्तम अभिनय पाहायला मिळतं. त्याच्या करिअरमधील सर्वांत चांगल्या भूमिकांपैकी ही एक असं म्हणायला हरकत नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 2:39 pm

Web Title: shahid kapoor vijay devarkonda kabir singh kiara advani djj 97
Next Stories
1 ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ म्हणणाऱ्या पाचही कलाकारांच्या आयुष्यातील अजब योगायोग
2 विश्वचषक स्पर्धेतील अनुष्काच्या या लूकची जोरदार चर्चा
3 #WarTeaser : हृतिकला भिडणार टायगर; हॉलिवूडला टक्कर देणारा जबरदस्त टीझर
Just Now!
X