18 October 2018

News Flash

आईसोबत लपंडाव खेळण्यात मिशा दंग

छोट्या मिशाच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो

शाहिद कपूरची मुलगी मिशा कपूर

शाहिद कपूरची मुलगी मिशा सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतेच मिशाचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आणि ते झपाट्याने शेअरही होत आहेत. या दोन्ही व्हिडिओमध्ये ती आईसोबत मजा- मस्ती करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Mishaaaa❤❤❤❤

A post shared by @ mira.kapoooor.fc on

पहिल्या व्हिडिओमध्ये ती आई मिरासोबत लपंडाव खेळताना दिसते. ती एका पडद्याच्या मागे लपते आणि मिरा तिला हाका मारताना दिसत आहे. तिला मिराने पडद्यामागे शोधून काढल्यावर छोट्या मिशाच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिशा मांजरीचा आवाज काढताना दिसते. यात तिने मांजरीचे चित्र असलेले टी-शर्ट वापरले आहे. या टी-शर्टवर कोण आहे असा प्रश्न तिला विचारला असता ती ‘म्याव’ असं उत्तर दिसताना दिसते.

काही दिवसांपूर्वी शाहिदने मिशासोबत काही फोटो काढले होते. या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करताना ‘हॅपी हॉलिडे’ असे कॅप्शन दिले होते. शाहिदच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर शाहिद लवकरच ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ सिनेमाचे दिग्दर्शक श्री नारायण सिंह याच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

First Published on January 3, 2018 1:55 pm

Web Title: shahid kapoor wife mira rajput plays with daughter misha video viral