News Flash

शाहिद कपूरची पत्नी मीराचा बोल्ड लूक; स्विमिंग सूटला कोल्हापुरी चप्पलेची जोड

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. मीरा अनेकदा तिचे फोटो आणि पती शाहिदसोबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमाणेच मीराचे देखील सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

मीराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मीराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. मीराने पीच कलरचा प्रिंटेड स्विम सूट परिधान केला आहे. तिच्या हातावर एक प्रिंटेड स्टोल आहे. तर मोठे कानातले आणि सनग्लासेसमध्ये तिचा लूक चांगलाच बोल्ड दिसतोय. या फोटोत लक्ष वेधून घेतेय ती मीराने पायात घातलेली कोल्हापुरी चप्पल. मीराने स्विम सूटमध्ये पोस्ट केलेल्या फोटोत तिच्या पायात पांढऱ्या रंगाची कोल्हापुरी चप्पल दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

कॅप्शनमध्ये मीराने म्हंटलंय, ” खराब होण्याच्या काही मिनटं आधी.” मीराचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मीराच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींने कमेंट केल्या आहेत. गायिका कनिका कपूर हिने “गॉर्जियस” अशी कमेंट करत हार्टचे इमोजी दिले आहेत. त्याचसोबत अनेक चाहत्यांनी मीराच्या फोटोला हार्ट आणि फायरचे इमोजी देत फोटोला पसंती दिली आहे. तर काही चाहत्यांना मात्र मीराचा हा बोल्ड लूक खटकला आहे. मीराला हा लूक सूट करत नसल्याचं काही युजर्सनी कमेंटमध्ये म्हंटलं आहे.

Maldives Diaries : ‘धकधक’ गर्लच्या दिलखेचक अदांवर चाहते फिदा

शाहीद कपूर आणि मीरा सध्या सुट्टी एन्जॉय करत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूरनेदेखील स्विमिंग पूलमधील एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता.

शाहिद कपूर आणि मीराच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. दोघांना एक मीशा नावाची मुलगी तर जैन नावाचा मुलगा आहे. सध्या शाहिद त्याचा आगामी सिनेमा ‘जर्सी’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 10:00 am

Web Title: shahid kapoor wife mira rajput posted photo in swimsuit bold look viral kpw 89
Next Stories
1 ‘राम सेतु’च्या सेटवर करोनाचा उद्रेक; अक्षय कुमारनंतर 45 जणांना करोनाची लागण
2 अखेर कपिल शर्माने बाळचं नाव सांगितलं; मुलाचं नाव आहे…
3 “तो क्षण मी कधीच विसरणार नाही..”, तारक मेहता मधील दया बेनने सांगितली पहिल्या पगाराची कहानी
Just Now!
X