17 November 2017

News Flash

बॉलिवूड पदार्पणाबाबत मीराचा सर्वात मोठा खुलासा!

आयफा पुरस्कार सोहळादरम्यान मीराने बॉलिवूड पदार्पणाबाबत खुलासा केला.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 6:30 PM

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत

‘आयफा २०१७’ हा अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला. या नेत्रदीपक सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्रींच्या फॅशनेबल कपड्यांपासून ते सेलिब्रिटी जोड्यांपर्यंत अनेक गोष्टींनी लक्ष वेधले. या सर्व झगमगाटात शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतची प्रतिक्रिया सर्वांत महत्त्वाची ठरली. मीरा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. मीरा आणि शाहिदने याबाबत अद्याप कुठलाही खुलासा केला नव्हता. मात्र आयफा पुरस्कार सोहळादरम्यान मीराने यासंदर्भात मोठा खुलासा केलाय.

येत्या काळात आम्ही तुला अभिनेत्री म्हणून पाहू शकतो का? असा प्रश्न एका पत्रकाराने मीराला या सोहळादरम्यान विचारले. यावर ती म्हणाली की, ‘नेहमी तुम्ही मला शाहिदसोबतच पाहिले आहे…(हसते) त्यामुळे बॉलिवूड पदार्पण सध्या दूर आहे.’ या उत्तरात बॉलिवूड पदार्पणाची चर्चा पूर्णपणे मीराने नाकारली नसून बऱ्याच अंशी ती सकारात्मक असल्याचे दिसले. म्हणजे लवकरच मीराला मोठ्या पडद्यावर पाहता येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वाचा : …म्हणून बोनी कपूरने अर्जुनला विचारलं तू ‘गे’ आहेस का?

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये मीरा आणि शाहिद एकत्र दिसले होते. इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावेळीही मीरा कॅमेरासमोर अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसली. चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत संबंध नसतानाही तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. त्यामुळे आता अभिनेत्री म्हणून ती पडद्यावर भूमिका कशी वठवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

First Published on July 17, 2017 6:30 pm

Web Title: shahid kapoor wife mira rajput talks about her debut in bollywood