News Flash

“तुझे कभी कोई टच ना करे”; कबीर सिंगने दिल्या कियाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कियारावर चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव केला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही तिला शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्वांमध्ये अभिनेता शाहिद कपूरने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अवश्य पाहा – “मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत”; महेश मांजरेकर संतापले

शाहिद कपूर आणि कियारामध्ये खूप चांगली मैत्री आहे. दोघांनी कबीर सिंग या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले होते. शाहिदने “हैपी बर्थडे प्रिती, कबीर उम्मीद करता है, कि तुझे कभी कोई टच ना करे” असं म्हणत कबीर सिंगच्या शैलीत कियाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खरं तर हा त्या चित्रपटातील एक डायलॉग आहे. हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला होता. शाहिद व्यतिरिक्त अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने देखील कियाराला शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य पाहा – Sushant Suicide Case: खरंच रिया चक्रवर्ती फरार आहे का? पाटणा पोलीस म्हणाले…

कियारा अडवाणी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. २०१४ साली ‘फगली’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘भारत आए नेनू’, ‘विनया विधेया रामा’, ‘कलंक’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केलं. ‘लस्ट स्टोरी’ ही वेब सीरिज आणि ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून तिला खरी प्रसिद्धी मिळाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 6:55 pm

Web Title: shahid kapoor wishes kiara advani in kabir singh style mppg 94
Next Stories
1 “सत्याचा विजय होईल,” एफआयआर दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आली समोर
2 VIDEO : अनुष्काला करायचीय शाहरुखच्या घरी चोरी; उचलणार ‘या’ तीन वस्तू
3 “सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X