बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनासशी साखरपुडा केला. मुंबईत झालेल्या छोट्याशा समारंभात दोघांचे कुटुंबीय आणि काही निवडक मित्र- मैत्रीण उपस्थित होते. रोक्याचे विधी पार पडल्यानंतर दोघांनीही इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली.

यावेळी शाहिद कपूरनं प्रियांकाला पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. कोणी एकेकाळी प्रियांका आणि शाहिद रिलेशनशिपमध्ये होते. प्रियांका आणि शाहिद २००९ साली आलेल्या ‘कमीने’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यावेळी या दोघांच्याही प्रेमाच्या चर्चा खूपच रंगल्या होत्या. मात्र प्रियांका शाहिदच नातं फार काळ टिकू शकलं नाही. शाहिद मीरा राजपूतशी विवाह बंधनात अडकला. शाहिद- मीराला एक मुलगीदेखील आहे.

निकच्या वाढदिवशी म्हणजेच १८ ऑगस्टला प्रियांकानं साखरपुडा केला. साखरपुड्याचं वृत्त ऐकून शाहिदनंही तिला शुभेच्छा दिल्या आहे. लग्न ही आयुष्यातील सुंदर गोष्ट आहे. मी अनुभवावरून सांगतो. प्रियांकाला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा असं शाहिदनं म्हटलं आहे. दरम्यान मुंबईत पार पडलेल्या या समारंभात प्रियांकाच्या जवळचे फक्त वीस एक मित्र- मंडळीच उपस्थित होते.