01 March 2021

News Flash

प्रतीक्षा संपली! शाहिदचा ‘जर्सी’ प्रदर्शनासाठी सज्ज

'या' दिवशी धडकणार चित्रपटगृहात

प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूर हा पंकज कपूर आणि नीलीमा अजीज यांचा मुलगा आहे.

शाहिद कपूर हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. शहिद आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘जर्सी’ असं आहे. शाहिदच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे हा चित्रपट येत्या ५ नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

‘जर्सी’ हा चित्रपट क्रिकेट या खेळावर आधारित आहे. गेल्या २ वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. खरं तर जर्सी २०२०मध्येच प्रदर्शित होणार होता. परंतु करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र अखेर यंदाच्या वर्षी दिवाळीत ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहिदने एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांनी दिली. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 1:37 pm

Web Title: shahid kapoors jersey will release on november 5 mppg 94
Next Stories
1 काय चालवलं काय आहे तुम्ही?; फोटो ग्राफर्सला पाहताच जया बच्चन संतापल्या
2 बॉलिवूडवर शोककळा; फुकरे चित्रपटातील अभिनेत्याचं निधन
3 Drugs Case : दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरसह करण सजनानीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Just Now!
X