News Flash

Shahid Kapoors pre-birthday bash : शाहिदसाठी मीरा बनली ‘होस्ट’

मीराने या सगळ्याचा विचार न करता पतीच्या मैत्रीणीला आमंत्रण दिले

शाहिद कपूर, मीरा राजपूत

बॉलीवूड सेलिब्रिटींसाठी कालचा रविवार हा पार्टीमय होता. जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत बॉलीवूडमधील सर्व प्रसिद्ध मंडळी पाहावयास मिळाली. ही पार्टी होती, बॉलीवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर याच्या वाढदिवसाची. खरंतर शाहिदचा वाढदिवस २५ फेब्रुवारीला असतो. पण, त्याची पत्नी मीरा राजपूत हिने त्याच्या वाढदिवसाची पार्टी आधीच दिली.

येत्या २५ फेब्रुवारीला शाहिद कपूर ३६ वर्षांचा होणार आहे. पार्टीनंतर ‘रंगून’ अभिनेता शाहिद आणि त्याची पत्नी मीरा यांनी छायाचित्रकारांना फोटोसाठी पोज दिल्या. यावेळी हे दाम्पत्य एकत्र फार सुंदर दिसत होते. पांढ-या रंगाचे टीशर्ट, जॅकेट आणि डेनिम अशा अगदी साध्या लूकमध्ये हा बर्थडे बॉय दिसला. तर मीराने सुंदर ड्रेस परिधान केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या लाडक्या पतीसाठी एका मोठ्या पार्टीचे आयोजन करण्याची कल्पना मीराची होती. तिची ही कल्पना यशस्वीदेखील झाली.

shahid-kapoor-mira

shahid-mita

आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात शाहिदसोबत काम करत असलेला रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही पार्टीला उपस्थिती लावली होती. दीपिकाने चकमकीत सोनेरी रंगाची पॅन्ट आणि काळ्या रंगाचा ब्लॅक टॉप परिधान केला होता. या निमित्ताने तिचा आणखी एक ग्लॅमरस लूक सर्वांना पहावयास मिळाला.

deepika-padukone

अभिनेत्री कतरिना कैफने फ्लोरल मॅक्सी परिधान केली होती.

‘आर. राजकुमार’ या चित्रपटावेळी शाहिदचे नाव सोनाक्षी सिन्हा हिच्याशी जोडले गेले होते. त्यानंतर हे दोन्ही कलाकार कधी एकत्र दिसले नाहीत. पण, मीराने या सगळ्याचा विचार न करता पतीच्या मैत्रीणीला आमंत्रण दिले आणि सोनाक्षीदेखील तिच्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी पोहचली होती. यावेळी सोनाक्षीचा स्पोर्टी लूक पाहावयास मिळाला.

sonakshi-sinha2

आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, सिद्धार्थ मल्होत्रा, सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ हे कलाकार पार्टीला एकटे आले. तर दुसरीकडे लवकरच ‘जुडवा २’ मध्ये झळकणारा अभिनेता वरुण धवन त्याची तथाकथित प्रेयसी नताशा दलाल हिचा हात धरून येताना दिसला. त्यानंतर आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा हेदेखील पार्टीत एकत्र वेळ घालवताना दिसले.

sidharth-malhotra6

आर. बल्की आणि गौरी शिंदे

r-balki-gauri-shinde

शाहिद आणि मीरा

mira-shahid

फरहान अख्तर

farhan-akhtar

फराह खान

farah-khan

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 11:49 am

Web Title: shahid kapoors pre birthday bash wife mira plays host deepika padukone sonakshi sinha farhan akhtar attend
Next Stories
1 VIDEO: त्या भिकाऱ्याने शाहरुखकडे जेवण मागितले आणि..
2 या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मृत्यूची सोशल मिडीयावर अफवा
3 सिने’नॉलेज’ : लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले नाटक कोणते?
Just Now!
X