News Flash

अझरसारख्या खेळाडूशी लग्न करायला आवडेल की…, शाहरुखने विचारला होता प्रियांकाला प्रश्न

सध्या त्यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे

सध्या बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यामुळे सध्या थ्रोबॅक व्हिडीओ आणि फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळतो. अशातच बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख प्रियांकाला लग्नाशी संबंधीत प्रश्न विचारताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ प्रियांकाच्या मिस इंडिया कॉम्पिडीशनच्या वेळचा आहे. या कॉम्पिडीशनमध्ये शाहरुख खान तेथे परिक्षक म्हणून उपस्थित असतो. दरम्यान तो प्रियांकाला एक कठिण प्रश्न विचारताना दिसतो.

खेळाडू, उद्योगपती आणि हिंदी फिल्म स्टार यांचे पर्याय देत शाहरुख प्रियांकाला विचारतो, ‘तु कोणाशी लग्न करशील? एक लोकप्रिय खेळाडू ज्याने अनेक विक्रम करत देशाचे नाव मोठे केले आहे. जसं की इथे उपस्थित असलेले अझर. किंवा एखादा उद्योगपती ज्याचे नाव Swarovski जे उच्चारणे देखील कठिण असेल. जो तुला दागिन्यांनी सजवेल. किंवा माझ्यासारखा एखादा हिंदी फिल्म स्टार जो तुला असे कठिण प्रश्न विचारेल.’

नंतर शाहरुख मजेशीर अंदाजात जर तु माझे नाव घेतले तर अझर आणि Swarovski यांना वाईट नाही वाटणार असे म्हटले आहे. पण प्रियांकाने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली होती. ‘हा थोडा कठिण प्रश्न आहे. पण मी याचे उत्तर देऊ इच्छिते असे प्रियांका म्हणते. ‘मी भारताला अभिमान असणाऱ्या खेळाडूची निवड करेन. त्याला माझा नेहमी पाठिंबा असेल. तसेच देशाला जितका त्याचा अभिमान असेल तितकाच मला ही असेल. जर तो देशाचा अभिमान असेल तर जगातील बेस्ट पती असेल’ असे तिने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 4:46 pm

Web Title: shahrukh khan asked priyanka chopra whome will she marry actress reply make everyone proud avb 95
Next Stories
1 “नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदान करणार नाही”; डोनाल्ड ट्रम्प यांना गायिकेने दिली धमकी
2 “त्या कठीण काळातून मी बाहेर येईन असं वाटलं नव्हतं”; परिणीतीने सांगितला नैराश्याचा अनुभव
3 भाईजान आता नाट्यकर्मींच्या मदतीला, पडद्यामागील कर्मचाऱ्यांना केली मदत
Just Now!
X