News Flash

शाहरुखने पूर्ण केली चाहतीची ‘मन्नत’

तिच्या आयुष्यातील हा वाढदिवस नक्कीच संस्मरणीय असेल

शाहरुख खान

बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराचे अनेक चाहते असतातच पण, शाहरुख खानच्या बाबतीत ही गोष्ट जरा निराळी आहे. शाहरुखचे चाहते अगणित आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुख कोणत्याही देशात गेला तरी त्याचे चाहते त्याला भरभरून प्रेम देतात. शाहरुखही कधीच त्याच्या चाहत्यांना नाराज करत नाही. शाहरुखची एक चाहती ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क ‘मन्नत’पर्यंत आली. शाहरुखनेही आनंदाने तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला.

मन्नतपर्यंत आलेल्या या चाहतीचे आनंदाने स्वागत करून शाहरुखने तिच्यासाठी एका स्कार्फवर स्वाक्षरी सुद्धा केली. मन्नतमधील त्याच्या ऑफिसमध्ये हे दोघे भेटले. तिच्या आयुष्यातील हा वाढदिवस नक्कीच संस्मरणीय असेल. फोटोमध्ये शाहरुखने पांढरा स्वेटशर्ट, ब्लू जीन्स व पांढरे स्पोर्ट्स शूज घातले आहेत. शाहरुखच्या चाहतीने या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शाहरुख या सगळ्यात व्यस्त असताना त्याची पत्नी गौरी खान व मुलगी सुहाना खान कलकत्त्याला एका लग्नासाठी गेल्या आहेत. त्या दोघींचे फोटोही सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरूख खानने कोणत्याही चित्रपटात भूमिका साकारली नाहीये. या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला योग्य प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर बॉलिवूडच्या किंग खानने कोणताही चित्रपट स्वीकारला नाहीये. सोशल मीडियावर शाहरूखच्या आगामी चित्रपटांबाबत खूप चर्चा सुरु आहेत. पण नक्की कोणती बातमी खरी हे समजणे कठीण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 12:27 pm

Web Title: shahrukh khan celebrates 50th birthday fan mannat
Next Stories
1 पराग कान्हेरेनं टीमच्या विरोधात जात सुरेखा पुणेकरांना दिला पाठिंबा
2 Bigg Boss Marathi 2 : …म्हणून आस्ताद काळेने सोशल मीडियावर लिहिली माधव देवचकेसाठी पोस्ट
3 ‘आशिकी’च्या प्रदर्शनापूर्वी महेश भट्ट यांनी लिहून दिलं, ‘मी दिग्दर्शन सोडून देईन’
Just Now!
X